‘बालगंधर्व’ मध्ये ऐतिहासिक वस्तूंचे संग्रहालय होणार

बालगंधर्व नाट्यगृहातील आर्ट गॅलरी मध्ये मिरज शहरासंबंधी ऐतिहासिक आणि कलात्मक वस्तूंचे संग्रहालय उभारण्यात येणार असून त्यासाठी आज स्थायी समिती सभापती निरंजन आवटी, नगरसेवक पांडुरंग कोरे, यांच्यासह आर्टिटेक्ट व अधिकाऱ्यांनी नाट्यगृहाची पाहणी केली. या संग्रहालयाचे काम लवकर सुरू करावे, अशा सूचना यावेळी सभापती आवटी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

मिरज शहराला वैभवशाली इतिहास आहे. सुमारे दोन हजार वर्षांपासून येथे विविध राजवटी नांदल्या. त्यांच्या पाऊलखूणा शहरात जागोजागी आहेत. या शहराचा सांस्कृतिक, नाट्य, संगीत, कला, क्रीडा, वैद्यकीय क्षेत्रात मोठा लौकिक आहे. या सर्वच क्षेत्राच्या ऐतिहासिक माहिती नागरिकांना, नव्या पिढीला व्हावी आणि त्याचे जतन व्हावे या भावनेतून “मिरज ऐतिहासिक संग्रहालय ” स्थापन करण्याबाबत महापालिकेने मंजूरी दिली असून बालगंधर्व नाटयगृहात असलेल्या आर्ट गॅलरीमध्ये हे संग्रहालय होणार आहे. यामध्ये जुनी दुर्मिळ छायाचित्रे, ऐतिहासिक वस्तू, जुने शिल्पाअवशेष, ऐतिहासिक कागदपत्रे मांडण्यात येणार आहेत. संग्रहालयासाठी विविध दालने करण्यात येणार आहेत.

त्यासाठी शुक्रवारी स्थायी समिती सभापती निरंजन आवटी, नगरसेवक पांडुरंग कोरे यांच्यासह महापालिका अधिकारी, आर्किटेक्ट व नाटयप्रेमीनी येथे प्राथमिक भेट देऊन जागेची पाहणी केली. तसेच नाट्यगृह नूतनीकरण मधील राहिलेल्या लाईट आणि साऊंड कामासंदर्भात ही माहिती घेतली. यावेळी माजी सभापती पांडुरंग कोरे, इतिहास अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर, महापालिकेचे पांडव साहेब, फाटक साहेब, कॉन्ट्रॅक्टर रुपनर, श्रेयश गाडगीळ, संदेश आदी उपस्थित होते. सदरचे संग्रहालयाचे काम लवकर सुरू करावे, अशा सूचना निरंजन आवटी यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या. सदरचे संग्रहालय मिरजेच्या वैभवात भर घालेल, अशा अपेक्षाही त्यांनी व्यक्त केल्या.

मानसिंग कुमठेकर     यांचे विविध विषयावरील Blog वाचण्यासाठी – Mansing Blog

Please check, Like, follow ModifierIN Facebook & Twitter

Recommend0 recommendationsPublished in Marathi, MODIFIER
share

Related Articles

मिरजेत 140 वर्षांपूर्वी छापलं लसीकरणावरचं पहिलं मराठी पुस्तक

कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी सध्या मोहीम उघडण्यात आली आहे. त्यामुळे या लसीकरणाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. मात्र, 140 वर्षांपूर्वी मिरजेत लसीकरणाची संपूर्ण माहिती देणारे मराठी भाषेतील…

Blog – जुन्या भांड्यांतून उलगडला दोनशे वर्षांचा इतिहास

वाडवडीलांनी जपून ठेवलेली तांब्या-पितळेची जुनी भांडी मोडीत घालून स्टीलची नवी भांडी घेण्याचा प्रघात गेली काही वर्षे रुढ झाला आहे. त्यामुळे अनेक वैशिष्टय़पूर्ण भांडी आणि त्यांची…

मिरजेच्या संगीत महोत्सवांचे ‘सीमोल्लंघन’

‘संगीत पंढरी’ अशी ओळख असलेल्या मिरज शहरात शंभर वर्षांहून अधिक काळ विविध प्रकारच्या संगीत सभांचे आयोजन केले जाते. नामवंत कलाकारांचे सादरीकरण आणि नेटके संयोजन यामुळे…

तीर्थक्षेत्र काशीच्या विकासात सांगलीचे योगदान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीर्थक्षेत्र काशीच्या विकासासाठी उचलेल्या महत्त्वाच्या पावलानंतर काशीतील मंदिरे, घाट, कुंड याबाबतचा इतिहास आणि त्यांच्या जीर्णोध्दाराबाबत देशभरच नव्हे तर, जगभर चर्चा सुरू…

सांगलीच्या प्राचीन इतिहासाचे पुनर्लेखन आवश्यक

सांगली जिल्ह्याच्या प्राचीन राजवटी आणि तत्कालीन सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक घडामोडींवर प्रकाश टाकणारे नवे शिलालेख गेल्या दोन वर्षात मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या अभ्यासकांना आढळून आले आहेत.…

Responses

Your email address will not be published. Required fields are marked *