मिरजेतील छत्रपती शिवाजी रस्त्यास 61 वर्षे पूर्ण

गेली काही दिवस शहरातील छत्रपती शिवाजी रस्ता हा चर्चेचा विषय बनला आहे. या बहुचर्चीत रस्त्याच्या नामकरणाची कागदपत्रे उजेडात आली असून, शिवजयंतीचे औचित्य साधून 27 एप्रिल 1960 रोजी तत्कालीन मिरज नगरपालिकेने या रस्त्याचे नामकरण ‘श्री छत्रपती शिवाजी रोड’ असे केले होते. बापूसाहेब जामदार यांनी रस्त्याच्या नामकरणाचा प्रस्ताव मांडला. मात्र, शिवजयंतीला कालावधी कमी असल्याने सभागृहात हा प्रस्ताव न मांडता नगरसेवकांकडे सर्क्युलर पाठवून त्यांची संमती घेण्यात आली. 22 एप्रिल 1960 रोजी काढण्यात आलेले हे सर्क्युलर मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर यांना उपलब्ध झाले आहे.

शहरातील मिशन चौक (सध्याचा महात्मा गांधी चौक) ते स्टेशन चौक हा रस्ता शहरातील प्रमुख रस्ता आहे. अतिक्रमणांमुळे हा रस्ता अरूंद झाला आहे. त्यातच निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. वारंवार अपघात होऊन काहींचा बळीही गेला आहे.

हा रस्ता नव्याने करून तो वाहतूकीसाठी सोयीचा करावा, अशी मागणी सातत्याने होत आहे. मात्र, या रस्त्याच्या कामाचे भीजत घोंगडे अनेक वर्षे पडून आहे. लोकप्रतिनिधींनी या रस्त्याच्या कामाची आश्वासने दिली. काही वेळा उद्घाटनाचे सोपस्कारही झाले. मात्र, रस्ता करण्याच्या हालचाली गतीमान झाल्या नाहीत. त्यामुळे गेल्या आठवड्यात आंदोलनाचा मार्ग अवलंबण्यात आला. त्यामुळे छत्रपती शिवाजी रस्ता हा संपूर्ण जिल्हय़ात चर्चेचा विषय बनला.

छत्रपती शिवाजी रस्ता

छत्रपती शिवाजी रस्ता या नावाने ओळखला जाणारा या रस्त्याचे नामकरण कधी झाले? याचा मिरज इतिहास संशोधन मंडळाने शोध घेतला असता सन 1960 च्या शिवजयंतीला या रस्त्याचे ‘श्री छत्रपती शिवाजी रोड’ असे नामकरण करण्यात आल्याचे दिसते. तत्कालीन नगरसेवक बापूसाहेब जामदार यांनी हा प्रस्ताव मांडला. त्यावेळी शिवजयंती ही पारंपारिक पध्दतीने तिथीनुसार वैशाख शुध्द द्वितीयेला साजरी केली जात असे. सन 1960 साली ही शिवजयंती 27 एप्रिल रोजी होणार होती.

मात्र, रस्त्याच्या नामकरणासाठी नगरसेवकांची संमती आवश्यक होती. शिवजयंतीला अवघे काही दिवस उरले होते. त्यामुळे सभा आयोजित करून त्यात नामकरणाचा प्रस्ताव मंजूर करून घेण्यासाठी वेळ लागणार होता. त्यामुळे तत्कालीन नगराध्यक्ष प्रभाकर महाबळ यांच्या सहीनिशी नामकरणाच्या प्रस्तावाचे सर्क्युलर काढण्याचे ठरले. मिरज नगरपालिकेने 20 एप्रिल 1960 रोजी नामकरणा बाबत सर्क्युलर प्रसिध्द केले. हे सर्क्युलर नगरसेवकांच्या घरी नेऊन त्यावर त्यांच्या संमतीदर्शक सह्या घेण्यात आल्या. सर्व नगरसेवकांनी या रस्त्याच्या नामकरणाला आनंदाने संमती दिली. त्यानंतर 27 एप्रिल 1960 रोजी मोठय़ा थाटामाटात या रस्त्याचे नामकरण ‘श्री छत्रपती शिवाजी रोड’ असे करण्यात आले. विशेष म्हणजे हा रस्ता त्याकाळी सिमेंट क्रॉकिटचा असल्याचे म्हटले आहे.

मिरज नगरपालिकेचे सर्क्युलर

मिरज शहर नगरपालिकेच्या सर्व सन्माननीय सभासदांना या सर्क्युलरने विनंती करणेत येते की, शिवजयंतीच्या शुभदिनी मिरज शहरातील स्टेशन रोड ते मिशन हॉस्पीटल पर्यंतच्या सिमेंट क्राँकिटच्या रस्त्यास ‘श्री छत्रपती शिवाजी रोड’ हे नामाभिधान देणेत यावे, अशाबद्दल सभासदांकडून आलेल्या प्रस्तावाप्रमाणे सदर सिमेंट क्राँक्रिट रस्त्याच्या नामाभिधानास आपली संमती द्यावी. शिवजयंतीचा सोहळा साजरा करण्यासाठी आता फारच थोडा कालावधी असल्याने सदर प्रस्तावाबद्दल सर्क्युलरने मान्यता घेणेत येत आहे.

मानसिंग कुमठेकर    यांचे विविध विषयावरील Blog वाचण्यासाठी – Mansing Blog
Please check, Like, follow ModifierIN Facebook & Twitter 
Recommend0 recommendationsPublished in Marathi, MODIFIER
share

Related Articles

मिरजेतील महात्मा गांधी मार्ग विस्मृतीत

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या मिरज भेटीची आठवण जागविणारा महात्मा गांधी मार्ग मिरजकरांच्या विस्मृतीत गेला आहे. शंभर वर्षांपूर्वी मिरजेतील ज्या मार्गाला महात्मा गांधींच्या पावलांचा स्पर्श झाला,…

सोन्याचे कमख्वाब ते रेशमाचे हीमरू मशरू

नीव्वळ सोन्याच्या धाग्यांपासून वीणकाम केले जाते ते कमख्वाब! आज कमख्वाब नामक कापड कुणीच तयार करीत नाही. सोन्याचे, रेशमाचे आणी अतीशय मुलायम अशा सुताचे धागे हातमागावर…

असा साजरा झाला पहिला महाराष्ट्र दिन

महाराष्ट्र राज्याची स्थापना एक मे 1960 रोजी झाली. यानिमित्त 25 एप्रिल ते एक मे असा ‘महाराष्ट्र राज्य निमिर्ती सप्ताह’ म्हणून साजरा झाला. राज्य स्थापनेच्या या…

सांगलीत हत्तीही खेळत रंगपंचमी

होळी पौर्णिमा ही विविध प्रातांत वेगवेगळ्या पध्दतीने साजरी केली जाते. सांगली आणि मिरज संस्थानात होळी, धुळवड, रंगपंचमी हे सलग येणारे तीन उत्सव वैशिष्टयपूर्ण रितीने साजरे…

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे सांगली-मिरजेशी ऋणानुबंध

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि बाबाराव सावरकर या सावरकर बंधूचे सांगली-मिरज शहराशी घनिष्ट संबंध होते. बाबाराव सावरकरांचे काही वर्षे सांगलीत वास्तव्य होते. तर, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी…

Responses

Your email address will not be published. Required fields are marked *